"सौ नवनीत कौर राणा”
नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि अमरावती साठी “सौ नवनीत कौर राणा” ह्या महिलेचं नाव बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजवर राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अपक्ष आमदार श्री रवी राणा यांच्या त्या पत्नी.
नवनीत कौर राणा यांच्याबद्दल जुजबी माहिती असलेले लोक लगेच कामाला लागले, आणि मग नवनीत यांचे जुने पाने फोटो फेसबुक आणि Whatsapp वर फिरू लागले. नवनीत यांना उमेदवारी मिळण्याचं खरं कारण मा. श्री शरद पवार साहेबच सांगू शकतील पण एक सामान्य नागरिक म्हणून विचार केल्यावर मला काही कारणं दिसतात ते अशी ...
1. मुळात आता सुशिक्षित वर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस ह्या दोन्ही पक्षांपासून दुरावत चाललाय. सुशिक्षित मतदारांप्रमाणेच सुशिक्षित उमेदवार मिळणंही त्यांना अवघड झालेलं असणार मग त्यातल्या त्यात १२वी शिकलेल्या नवनीत ताई दुसरी किंवा तिसरी शिकलेल्या उमेदवारांपेक्षा ग्रेटच.
2. वर्षानुवर्ष तेच तेच चेहेरे बघून लोक कंटाळतात. एक नवा आणि “बघणेबल” चेहेरा लोकांसमोर आणून एकूणच “राष्ट्रवादी कॉंग्रेस” बघणेबल व्हावी असं पवार साहेबांचं गणित असणार. निदान अशा बघणेबल चेहेऱ्याकडे बघून तरी जनता अजितदादा पवारांची “मुक्ताफळं”, सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा, भुजबळांची रोज उघडकीला येणारी नविन प्रकरणं हे सगळं विसरेल अशी साहेबांची खात्री असणार.
3. लोकसभेत आरडाओरडा करणारे, निरर्थक घोषणाबाजी करणारे खासदार जनतेचं पुरेसं मनोरंजन करू शकत नाहीत. पवार साहेबांनी आय.पी.एल वाल्यांची कल्पना वापरली असणार. आय.पी. एल मध्ये कसं क्रिकेटचा थरार वाढविण्यासाठी विकेट पडल्यावर किंवा चौकार षटकार मारल्यावर मनोरंजन असतं. नवनीतताईना लोकसभेत बसवून लोकसभेची शोभा वाढविण्याचा पवार साहेबांचा “उदात्त हेतू” असणार. त्या निमित्ताने लोकसभेचं “Live” प्रक्षेपण करणाऱ्या channels चं पण टी.आर.पी. वाढेल.
नवनीत ताईना उमेदवारी का दिली हे एक तर साहेब जाणोत आणि ताई जाणोत. मतदार काय गोविंदालाही निवडून देतात. तुम्हीही हा लेख केवळ त्यांचा फोटो बघून उत्सुकता वाढली म्हणूनच वाचलात की नाही ? त्या निवडून आल्याच तर डोक्यावर पदर घेऊन संसदेच्या पायऱ्या चढतानाचे त्यांचे फोटो पण असेच बघा आणि शेअर करा म्हणजे झालं.
एक
मनोरंजनोत्सुक ( “निखळ” मनोरंजनासाठी उत्सुक असलेला )
ता.क. – नवनीत ताईना उमेदवारी मिळाल्यापासून कु. राखी सावंत देखील निरनिराळ्या पक्षांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत अशी बातमी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा