रात्री साधारण दोन अडीचच्या सुमाराला मोबाईल वाजला......चरफडत आणि डोळे चोळत घेतला .......... एका सख्ख्या मित्राचा फोन होता ..........
.
“अरे झोपला होतास का “.............त्याने विचारलं
“नाही........... मजल्यावरच्या मुक्या गोखले काकू, बहिऱ्या काळे आज्जी आणि मी मिळून आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळतोय .............साल्या ....ही वेळ आहे का फोन करायची ?” मी वैतागून विचारलं
“अरे मी आत्ता अमेरिकेत आहे.........आपल्याकडे किती वाजलेत रे” तो गप्पा मारायला चालूच झाला
“तू अमेरिकेत आहेस हे सांगायला फोन केला आहेस? की इथे किती वाजलेत हे विचारायला तू रात्री अडीच वाजता फोन केला आहेस ?” मी डोळे चोळत पुढे विचारलं

“अरे एक मस्त बातमी आहे ..........मी इथे जो कोर्स करत होतो ना त्यात पहिला आलोय” त्याने माझ्या कुचकट प्रश्नांकडे दुर्लक्ष करत त्याचंच घोडं पुढे दामटलं
“हो का अरे व्वा...व्वा ...व्वां.. मला सांग ............तू एकटाच होतास की काय ह्या वर्षी त्या कोर्सला ?” मी पण जिद्दीने माझा कुचकटपणा पुढे रेटला

त्याने एक सणसणीत शिवी हासडून बाकी काहीही न बोलता फोन कट केला .........पूर्वी फोन आपटायचे तसे आता मोबाईल आपटत नाहीत सहसा, म्हणून बरं .............नाही तर त्याच्या एका फोनचे चार नक्कीच झाले असते
....
च्यायला एक तर ह्या असल्या स्कॉलर पोरांमुळे आमचं अर्ध आयुष्य “बघ त्याच्याकडे .....शिक काही त्याच्याकडून .....सुधार आता तरी” ………असा उद्धार करून घेण्यात जातं ................ आणि त्यातून हे लोक असे फोन करून स्वतःची कौतुकं सांगून डोक्याची अजून काशी करणार …..
.
मी मोबाईल सायलेंट मोडवर टाकला ...............आणि पुन्हा ताणून दिली .............एक बदला अब शुरू हुआ