मुळात
मी विश्वास पाटलांच्या लिहीण्याचा कट्टर भक्त, सर्वात पहिली कादंबरी वाचली ती
झाडाझडती. मग व्यसनच लागलं पाटलांच्या लिहीण्याचं. चंद्रमुखी, पानिपत, पांगिरा,
महानायक , संभाजी, नाना पाटलांवरचं क्रांतीसुर्य, रणांगण अशी जवळपास सगळीच पुस्तकं
आधाशासारखी वाचून काढली.
बरेच
दिवस येणार येणार ऐकलेलं लस्ट फॉर लालबाग हातात पडेपर्यंत जीव वरखाली होत होता.
पुस्तक वाचायला घेतलं...... जसजसं पुस्तक वाचून होत गेलं तसतसा मी मात्र पुस्तकापासून
Disconnect होत गेलो. काही तरी चुकतंय असं वाटत राहिलं. इच्छा होत नव्हती तरीही
शेवटपर्यंत वाचून काढलं.
Normally
चांगल्या कादंबरीवरून चित्रपट काढला जातो पण पुस्तक वाचताना सतत कुठे तरी असं वाटत
राहिलं की कुठल्या तरी “मसाला” चित्रपटावरून ही कादंबरी लिहीली आहे. गिरणी कामगार .......बंद
पडत चाललेल्या गिरण्या .......दत्ता सामंतांनी कामागारांसाठी दिलेली झुंज .......त्याच
वेळी गुन्हेगारी विश्वाचा मुंबापुरीवर वाढत चाललेला प्रभाव ............आणि चोरावर
मोर असलेले राजकारणी........त्यातच नायकाची प्रेमकथा ........तत्त्वासाठी झगडणारा
त्याचा बाप .............आणि मग कलाटणी देणारा ........अनपेक्षित शेवट.... हे सगळं
सगळं आहे कादंबरीत
वास्तव चित्रपटातला संजय दत्त सापडला कादंबरीत, जागोजागी दिवार मधला अमिताभ सापडला,“अपहरण” चित्रपटातला अजय देवगणचा बाप सापडला कादंबरीत, वास्तव मधलीच रिमा लागू पण सापडली .........फक्त माझ्यासाठी “ग्रेट” असलेले विश्वास पाटील मात्र शेवटपर्यंत नाही सापडले मला कादंबरीत.
त्यांच्या आधीच्या लिखाणामुळे माझ्याच अपेक्षा मी खूप वाढवून ठेवलेल्या असतील किंवा असंही असेल की मला कादंबरी कळलीच नाहीये.