लेखक - शेषराव
मोरे
पुस्तकाबद्दल अनेक परस्परविरोधी लेख निरनिराळ्या वृत्तपत्रात आणि इंटरनेटवर वाचनात आले आणि पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झालं म्हणून पुस्तक घेतलं. पुस्तकात मांडलेली मतं चूक की बरोबर त्यावर इतिहासाचे किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक चर्चा करत राहतील पण एक वाचक, एक भारतीय नागरिक म्हणून काही गोष्टींची नोंद घ्यावीशी वाटली.
१. १८५७चं बंड मुळात इस्लामी राज्यकर्त्यांनी “पुरस्कृत” केलेलं बंड होतं.
२. ब्रिटीश राज्यसत्तेने ह्या बंडाचा सूड एवढा भयानक पद्धतीने घेतला ज्याची तुलना हिटलरने केलेल्या ज्यू हत्याकांडाशीच होऊ शकते. दिल्लीतल्या प्रसिद्ध जामा मशिदीचा वापर अनेक महिने घोड्यांच्या तबेल्यासाठी केला गेला. चौकाचौकात हजारो मुसलमानांना फाशी दिली गेली. मिर्झा गालिबने लिहिलेलं खरं मानायचं झालं तर एकट्या लखनौ मध्ये मुस्लिमांची संख्या अडीच लाखावरून एक हजारावर आली. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना परागंदा होण्याची वेळ भारतीय इतिहासात पहिलीच असावी.
३. मोगल खानदानातील २९ पुरुषांना संपविण्यात आलं.
४. स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात “सर अहमद” यांनी प्रथम मांडली. जीना त्या वेळी बहुदा जन्मालाही आले नसावेत
५. राष्ट्रवादी मुस्लीमांना अखंड भारत हवा होता पण हिंदुच्या बरोबरीने सत्तेत भागीदारी ( ५०%) हवी होती ( जेमतेम १५% असूनही )
अतिशय विचारपूर्वक आणि मुद्देसूद केलेल्या मांडणीमुळे संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे. फाळणीबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार ह्या विषयावर पुरेसा बोलका आहे.
“जर हिंदुस्थान अखंड राहिला असता, तर हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते...
मुसलमान ही शासनकर्ती जमात बनली असती... जेव्हा फाळणी झाली; तेव्हा मला वाटले की, परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंध, महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
मला एकच वाटतं “आज पाकिस्तान आणि पाकिस्तानी मानसिकता सीमेच्या पलीकडे आहे, मधे पोलादी भारतीय लष्कर आहे तरीही आपल्याला एवढा उपद्रव आहे, हीच कीड सीमेच्या अलीकडे असती तर तुमचं आमचं आयुष्य १००% नरकच झालं असतं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा