लेखक - समर खडस
अफाट पुस्तक, प्रत्येक कथा अफाट, हलवून टाकणारी. स्वतःची समाजवादी विचारसरणी न लपविता खडस स्वतःला समाजवादी म्हणविणाऱ्यांचे बुरखे सहज फाडून काढतात. so called "System" वर हल्ला चढवताना हल्लेखोरांच्या "मर्यादा" स्पष्ट करून दाखवायलाही खडस कचरत नाहीत.
बकऱ्याची बॉडी खेरीज "भायेरची", "नशीब", "असे हे विलक्षण जग", "बेगम", "रेताड", "त्या तिथे", "तवंग नाही तलावात" ह्या कथा असलेलं हे पुस्तक एकदा हातात घेतलं की सोडवत नाही.
भाऊ पाध्येंची आठवण होते प्रत्येक कथा वाचताना. खूप दिवसांनी एवढं "सकस" काही वाचायला मिळालं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा