रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?

एक थोर चीनी विचारवंत म्हणायचे "जोवर मांजर उंदीर खातंय तोवर ते पांढरं आहे की काळे याने काही फरक नाही पडत "
वरवर बघितलं तर हा व्यवहारवाद सहज पटण्यासारखा आहे.
.
सरकार बाबत पण मला तसंच वाटायचं .....काम करतंय ना ? मग ते "भगवं" "हिरवं" किंवा निळे असलं तरी चालेल.
अनेक अडचणीचे उंदीर सरकारने मारलेत हे मान्य आहे पण....
.
मी काय बघायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय बोलायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय खायचं नाही हे सरकार ठरवणार
कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: