शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

बिहार विधानसभेचे निकाल

बिहार विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झाली तसे भाजपचे सोशल मीडियावरचे विद्वान वाचाळवीर भलतेच कार्यरत झाले.
"दिल्लीत सुशीक्षीतांनी आप ला निवडून आणले मग पाणीपूरीवाल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार" अशा आशयाची बेताल वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक वॉल वर झळकायला लागली.

खरं तर "पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला फसवणं सोपं होतं पण पाणीपुरीवाल्यांना फसवणं भाजपला अवघड गेलं" असंही म्हणता येईल की.

दीड वर्षापूर्वी मिळालेला विजय भाजपला अजुन पचवता आलेला नाही त्यात हा असा पराभव कुठून पचणार ?

उन्माद ....पक्षाच्या विरोधातले ते सगळे मुर्खच ही भूमिका ....वाचाळवीरता ...... हे सगळे गुण भाजपच्या पक्षशिस्तीचा भाग झालेत का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: