रोजच्या प्रमाणे त्या दिवशीही ऑफ़िसला जाण्यासाठी म्हणुन कॉम्प्लेक्स च्या गेटमधुन बाहेर पडलो, समोर बघितलं
तर रस्त्याच्या पलीकडे चक्क ४/५ शेअर रिक्षावाले रांगेत उभे होते. कहर म्हणजे टोळकं करून बिड्या ओढत एकत्र न उभे राहता आपापल्या रिक्षात बसून होते. मी रस्ता
क्रॉस करणार तेवढ्यात माझ्यासमोर एक रिकामी रिक्षा थांबली.
रिक्षावाल्याने
अदबीने विचारलं "साहेब कुठे जाणार"
खरं तर आमच्या इथून रिक्षावाले ..........कधीच कुठेच जात नाहीत
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
मी चाचरत उत्तर दिलं "स्टेशन"
तो पुन्हा तेवढ्याच
अदबीने म्हणाला "बसा साहेब"
"किती पैसे
घेणार ?" महिनाअखेर होती ......... पुन्हा चाचरतच मी विचारलं
रिक्षावाला चक्क गोड
हसला आणि म्हणाला "काय साहेब थट्टा करताय ? मिटर ने होतील तेवढेच दया "
मला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं, मी तसाच रिक्षात बसलो, त्याने मिटर टाकलं, मिटरचा आवाज ऐकुन दचकुन मी थोडा भानावर आलो. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच कल्याणातल्या रिक्षाच्या मिटरचा एवढा गोड आवाज ऐकला होता आणि चालु असलेलं मिटर पण बघितलं होतं.
रिक्षा चालवता
चालवता रिक्षावाले साहेब सांगायला लागले
"आता आम्ही
प्रवाशांशी सौजन्याने वागायचं ठरवलंय, प्रत्येक रिक्षामधे एक रजिस्टर
ठेवलंय त्यात प्रवाशांनी आमची सेवा कशी वाटली त्याबद्दल लिहायचंय, सर्वात चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकाचा आमच्या युनियनतर्फ़े सत्कार
केला जाणार आहे, आम्ही रिक्षा चालवताना शिव्या देणार नाही,
गुटखा खाउन पचापचा थुंकणार नाही, फ़ालतु
कारणांसाठी प्रवाशांना झोडणार नाही, कुठलंही भाडं नाकारणार
नाही, रात्रीची वेळ बघुन प्रवाशांना लुटणार नाही"
रिक्षावाल्या
साहेबांचं सौजन्य पाहुन माझ्या डोळ्यासमोर पुन्हा अंधारी यायला लागली तेवढ्यात
एकही हादरा बसु न देता रिक्षा स्टेशनला पोचली.
"किती
झाले
?" मी पुरता सावरलो नव्हतोच खरं तर
"सतरा
रुपए पन्नास पैसे" मी विसची नोट दिली
त्याने
अडीच रुपए परत केले, मला पुन्हा गरगरायला लागलं, आज
ऑफ़िसमधे सगळ्यांना चहा पाजायचं ठरवुन मी स्टेशनकडे वळलो.
साला...................पुन्हा
तेच.......... बायकोने पुन्हा तोंडावर पाणि ओतुन झोपेतुन उठवलं आणि कळायला
लागल्यापासुन ( नक्की कितव्या वर्षापासुन कळायला लागलं त्याबद्दल वाद होवु शकतो
म्हणुन वर्ष लिहीली नाहीत) उराशी जीवापाड जपलेलं एक स्वप्न पुन्हा मोडलं.
माझ्या
स्वप्नाचा चक्काचुर होत असताना "खळ्ळ्ळ फ़टॅटॅटॅक" असा आवाजही आला
मंडळी..........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा