मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

..................मन:पूर्वक अभिनंदन ............



















कल्याण महापालिकेतील, लाचखोरीच्या आरोपासाठी निलंबित असलेल्या लाचखोर अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात येत आहे.
****आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी
****रुजू करून घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या नगरसेवक
****ह्या निर्णयाविरोधात तोंड न उघडता मुग गिळून बसलेल्या सर्व नगरसेवक
****महापालिका क्षेत्रातून निवडून आलेले पण ह्या निर्णयाविरोधात तोंड न उघडलेल्या सर्व खासदार, आमदार


या ज्ञात आणि अज्ञात सर्व मान्यवरांचे ***
****आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माझ्या सकट सर्व नागरीकांचे देखील ....
..................मन:पूर्वक अभिनंदन .............

माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलंय ..........

सगळे लाचखोरीचे आरोप असलेले अधिकारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभे आहेत ...........विजयी वीरांच्या थाटात त्यांना ओवाळलं जातंय..............तुतारी, ढोल ताशे अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात हे अधिकारी आपापल्या दालनांकडे रवाना होताहेत ..............एरवी भकास दिसणारी महापालिका फुलांनी सजवलीये ..........त्यांच्या वाटेत फुलं उधळली जाताहेत ........महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी एकेका लाचखोराला हाताला धारून त्याच्या त्याच्या खुर्चीवर बसवताहेत ............अहाहा ...........

"काय वर्णावा तो सोहळा"
बहुतेक .........अच्छे दिन आ गये