शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

डेव्हिड हेडली........इशरत जहां........मुंब्रा हृदयसम्राट




डेव्हिड हेडली जे सांगतोय ते खरं मानून आपण जर पाकिस्तानला आणि आय एस आय ला २६/११ साठी जबाबदार धरणार असू तर त्या इशरत जहां साठी गळे काढणाऱ्या तमाम "धर्मनिरपेक्ष" वगैरे महात्म्याना "देशद्रोही" ठरवून त्यांच्यावर पण खटले भरायला हवेत

सगळ्यात आधी तर इशरतला शहीद ठरवून तिचं वकीलपत्र घेतलेल्या त्या "मुंब्रा हृदयसम्राटाला" उचलून जेल मध्ये टाकायला हवं .........पाच लाख दिलेले ना तिच्या कुटुंबाला ?
एका ठराविक धर्माच्या बदनामी साठी भाजपच हे सगळं त्या हेडली कडून वदवून घेतंय असंही एका "विद्वानाने" म्हटलंय ......

बरं झालं ते दिग्बीजय सिंग अजून "हनिमून" मध्ये व्यस्त आहेत नाही तर म्हणाले असते ....... "हेडली अतिरेकी नव्हताच तो तर "संघाचा" माणूस आहे .....आणि अमेरिकेतून नाही .........संघाच्या नागपूरच्या मुख्यालयात बसून तो साक्ष देतोय .........."

येड्याचा आणि बाजार साला

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

महिला आणि शनि बघतिल ना काय ते ...

प्रत्यक्ष शनिदेवापेक्षा त्याची बडवेगिरी करण्यात धन्यता मानणारेच महिलांच्या मंदिर प्रवेशाने धास्तावलेत
महिला आणि शनि बघतिल ना काय ते ... तुम्ही कशाला रक्त आटवताय ?

आणि दुसऱ्या धर्माची उदाहरणं कशाला देताय?

स्टेशन बाहेर रिक्शावाले कुठे जायचंय विचारतात .... आपण सांगितलं की पुढच्या रिक्षाकडे बोट दाखवतात .....मग तो रिक्शावाला पुन्हा त्याच्या पुढच्या रिक्षाकडे बोट दाखवतो....मग पुन्हा....

भाऊ तुम्ही तुमचं बोला ना काय ते उगाच लोकांचे दरगे कशाला दाखवताय

महिलांनी शनीदेवाची पूजा केल्याने ज्या कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार असतील त्यांनी खरं तर ताबडतोब काळे सफारी सूट घालून शनी देवाची "बाउन्सरगिरी" करायला शनी शिंगणापूरला पळत सुटायला हवं.
उगाच सोशल मिडीयावर लिहीत बसून सुशिक्षित असल्याचा आव आणण्यात काय अर्थ आहे ?

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

मालक


आपण सगळे कळपातली
मेंढरं झालो आहोत
युगानुयुगे चाबकाच्या इशा-यावर
चालत आलो आहोत

चाबुक तोच असतो
पण बदल होतो हातांचा
चाबुक खरं झेंडा असतो
बेगडी, पोकळ ध्येयवादाचा

चाबकाच्या एका इशा-यावर
कधी हिंस्त्र पशु होतो
कधी एकमेकांना डसणारे
काळे विषारी साप होतो

झडतात आपली बोटं
अजिंठा, खजुराहो घडविणारी
मग फ़ुटते हातालाच एक मशाल
निरपराध घरं जाळणारी

सगळ्या कळपांच्या सगळ्या मालकांना
हेच तर हवं असतं
मानवतेच्या प्रेतांचा जाळ करुन
त्यांना शेकत बसायचं असतं

सगळ्या कळपांचे सगळे मालक
कधीकधी एकत्र जमतात
वेळ घालवायला मालक
मस्त रमीचा डाव मांडतात

सत्तेचा आणि संपत्तीचा
ट्रायो बनवताना
छोटया मालकांचे
लाचार जोकर होतात

नको असलेले,तत्त्वांचे पत्ते
मालक खुशाल फ़ेकुन देतात
नवी गणितं नवे सिक्वेन्स
पुन्हा नव्याने जुळवत राहतात

आपण असतो कोंडलेले,
कळपाभोवतीच्या कुंपणात
झुंजतो आपण दुस-या कळपाशी
किंवा लढतो आपापसात

बंड वगैरे कर्मदरिद्री विचार
दाबून टाकतो मुर्खपणा मानून
रोज थोडं थोडं मरत राहतो
आतल्या आत सडून

जाणवतंय तुम्हाला ह्यातलं काही ?
पटतंय माझं म्हणणं की पटायचंय ?
आता "वा" किंवा "छान" म्हणुन
पटकन आपल्या कळपात परतायचंय ?...... आता "वा" किंवा "छान" म्हणुन पटकन आपल्या कळपात परतायचंय ?

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

पुणं बदललंय ?

पुणं हल्ली खुप बदललंय .... कालपासून बघतोय ..... काल हॉटेल मध्ये जेवायला गेलो तर वेटर अदबींने बोलत होते

सकाळी 8 वाजता खाली उतरलो तर चक्क वाण्याचं दूकान उघडलेलं होतं

मला जाम चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं

सकाळी मिसळ खायची होती AvanTea Mehta ला विचारल, तिने काटा किरर् म्हणून एक ठिकाण सुचवलं ... आणि आत गेल्या गेल्या ही पाटी बघुन जीव भांड्यात पडला.

एक मिसळ दोघात खायची असेल तर 20 रूपए Extra भरावे लागतील ही धमकीवजा सूचना वाचून आपण पुण्यातच असल्याची खात्री पटली

मिसळ पण पाटी वरच्या धमकीपेक्षा तिखट ...पण तितकीच "सही"