सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४
रविवार, ६ जुलै, २०१४
" Priorities "
एखादया व्यक्तीसाठी किंवा कामासाठी "वेळच" मिळत नाही असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा खरा प्रश्न "Priorities" चा असतो. समोरच्याला वाईट वाटायला नको म्हणून आपण वेळेचं कारण पुढे करत असतो.
तसं नसतं तर ज्यासाठी एकाला वेळ मिळतो त्यासाठी दुसऱ्याला वेळ कसा नसतो ? समजुन उमजुन किंवा नकळत आपण प्रत्येक गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी आपल्या डोक्यात "सेट" असलेल्या " Priorities " प्रमाणेच निर्णय घेत असतो.
शनिवार, ३ मे, २०१४
अबू आजमी आणि दिग्बिजय सिंग
कुठे तरी बोलताना अबू आजमी म्हणाले " जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मतदान करत नाहीत, ते खरे मुस्लिम नाहीत "........................हे असले अकलेचे तारे तोडून अबू आजमी सारखे नेते त्या समाजाचं जेवढं नुकसान करतात तेवढं त्या समाजाच्या कट्टर विरोधक असलेल्या संघटना मनात आणूनही करू शकत नाहीत.
कॉंग्रेसचे दिग्बिजय सिंग आणि समाजवादी पक्षाचे अबू आजमी एकाच शाळेत शिकलेले असणार. त्याशिवाय दोघांनाही इतकी पराकोटीची बेताल वक्तव्य सातत्याने करत राहणं शक्यच नाही.
रविवार, २७ एप्रिल, २०१४
ए आयटम ....
ठाणा स्टेशनला दोन नं. Platform वर कल्याणला जाण्यासाठी लोकलची वाट बघत उभा होतो. समोर तीन नं platform वरुन कर्जतला जाणारी गाडी नुकतीच निघत होती.
दोन आणि तीन नं track च्या मधे एक साधारण 18/19 वर्षांची भंगार वेचणारी मुलगी प्लास्टिक आणि पत्र्याचे टीन शोधत होती. इतक्यात नुकत्याच सुटलेल्या गाडीतील एक टोळकं तिला "ए आयटम" ......"ए छावी "म्हणुन हाका मारू लागलं. तिने मागचा पुढचा विचार न करता एक दगड उचलला .......जीव खाऊन तो त्या टोळक्याच्या दिशेने भिरकावला...... दगड एकाच्या पायावर perfect बसला. ते कार्ट कळवळून गाडीतच धडपडलं.
ती मुलगी शांतपणे पुन्हा तिच्या कामाला लागली. जणू काही झालंच नाही.
मला समजत नाहीये की मी तिच्या बेडर पणाला सलाम करू की हे सगळ होत असताना गर्दीचा हिस्सा बनुन बघत राहिलो त्याची शरम बाळगु ?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


