बुधवार, ८ ऑगस्ट, २००७

उठ अफ़जला

भारतीय संसदेवरच्या हल्ल्यात फ़ाशीची शिक्षा हौउनही हिरो बनु पाहणारया अफ़जलला शतशः प्रणाम
हीच लायकी आमची
धर पुन्हा वेठीस आम्हा
हीच पायरी आमची
जा पुन्हा तुडवुन आम्हा
ह्या मातीतच शिवा जन्मला
फ़ाडुन अफ़जल त्याने मारीला
नको घाबरु गडया कुणा तु
इतिहास शिवा अन वर्तमान तु
बांधु स्मारक तुझ्या स्मृतीचे
तुझा पराक्रम स्मरण्यासाठी
हिरवी शाई आम्ही वापरु
इतिहास उध्याचा लिहीण्यासाठी
शरीराने तु कधीही मरशील
मनात अमुच्या कायम असशिल
भारतभुची शकले पडतील
त्या वेळी तु शहिद ठरशिल
दीलीही असती फ़ाशी तुला मी
पण दोरी तितकी मजबुत नाही
रस्त्यावरले श्वान मारण्या
इथे आम्हा परवाना नाही
म्हणुनच म्हणतो...........
उठ अफ़जला, पुन्हा घाल घाव तु
धाव संसदी असाच एक बॉम्ब फ़ोड तु
रक्त थंड आमुचे पुन्हा खुशाल ढोस तु
वस्त्र मायभुमीचे, पुन्हा खुशाल फ़ेड तु

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: