सोमवार, २७ एप्रिल, २०१५

नॉट विदाउट माय डॉटर - बेट्टी मेहमुदी


मूळ लेखिका बेट्टी मेहमुदी,

अनुवाद लीना सोहोनी

अमेरिकन संस्कृतीत वाढलेली एक तरुणी मूळच्या इराणी मुस्लीम डॉक्टरच्या प्रेमात पडते, त्याच्या भूलाथापाम्ना बळी पडून काही काळासाठी इराणला जायला तयार होते आणि माग मात्र त्याचा खरा चेहरा बघून उध्वस्त होत जाते. पराकोटीचे अत्याचार सहन करूनही लेखिका स्वदेशी परतते.

सतत प्रचंड अपमान , अनन्वित अत्याचार सोसूनही शेवटच्या क्षणापर्यंत वाघीणीसाराखी लढणारी एक समर्थ आई, एक एकाकी स्त्री एका बाजूला तर पराकोटीचा इस्लामी पुरुषसत्ताक समाज एका बाजूला. असा हा खरं तर असमान लढा.

वाचायला घेतल्यावर शेवटच्या पानापर्यंत पुस्तक हातून सोडवत नाही एवढं मात्र खरं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: