लेखक – श्री.ना पेंडसे
पुस्तकाचं नाव वाचून मला
वाटलेलं “हत्या” म्हणजे खून ह्या अर्थी, एखादी रहस्य कथा असावी पण मग कळलं ते कादंबरीतल्या
एका व्यक्तिरेखेचं नाव आहे.
जेमतेम कळायला लागणाऱ्या
वयातल्या एका मुलाची ही कथा. ढीगभर दुःख आणि गळ्यापर्यंत अडचणी सोसत पुढे जात
राहणाऱ्या एका कोवळ्या जीवाची जीवघेणी धडपड. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता साधं दिसणारं
पण वळणा वळणांनी पुढे जात राहणारं खिळवून ठेवणारं कथानक.
“तुंबाडचे खोत” प्रमाणेच तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते, वाचता वाचता आपणही त्या काळाचा, हत्याच्या आयुष्याचा एक भाग होवून जातो.
“तुंबाडचे खोत” प्रमाणेच तत्कालीन परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते, वाचता वाचता आपणही त्या काळाचा, हत्याच्या आयुष्याचा एक भाग होवून जातो.
खूप छान कादंबरी