लेखक - अनंत सामंत
पुस्तकाचं नाव वाचल्यावर वाटलं भाषांतर असेल पण नंतर कळलं मुळ मराठीच पुस्तक
आहे.
अथांग सागर आणि हा सागर पार करायला लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती. निसर्गाशी, स्वतःच्या भावनांशी, मर्यादांशी अपुऱ्या
साधनांच्या सहाय्याने टक्कर देत पुर्ण केलेली एक भयाण सफ़र.
बापाच्या विकृतीवर विकृत सुड घेणारी उज्वला, खेडवळ पत्नीला पाश्च्यात्य संस्कृतीत वावरायला तयार करायला धडपडणारा,
प्रसंगी त्यासाठी तिच्या भावनांचा विचार न करता लैंगिक विकृतीकडे
झुकणारा दीपक, ह्या सगळ्या छळवादातुन जवळपास वेडी झालेली
उज्वला, वेश्यालय चालवणारी ॲना प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे वेगळं अस्तित्व
आहे तरी एक क्षण असा येतो की प्रत्येकाचा शेवटही एकच दिसु लागतो. त्यावेळी
प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाच्या मर्यादा अधोरेखित करतात.
जहाजावरचं आयुष्य, तिथली दडपणं तिथले धोके आणि
ह्या सगळ्याला कसलीही भिक न घालणारा व्यवहार खुप संयमित भाषेत चित्रीत केलाय
सामंतांनी.
पुस्तक वाचुन झाल्यावर मानवी विकृती, हव्यास,
निसर्गाशी लढताना दिसणाऱ्या मर्यादा सगळं सगळं आपल्यावर अनेक ओरखडे
उठवुन जातं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा