मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी"

























संजय भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" येतोय. काल त्यातलं एक गाणं whatsapp वर पाठवलं कोणी तरी ....... चक्क बाजीरावांच्या पत्नी काशीबाई, मस्तानी बरोबर नाचताना दाखवल्या आहेत.


सिनेमा म्हटल्यावर थोडाफार मसाला घालावा लागतो वगैरे ठीक आहे पण इतका ? पैसे कमवण्यासाठी इतिहासाची इतकी मोडतोड़ ?

आधीच थोर ब्राह्मणद्वेष्टया इतिहासकारांनी बाजीराव ही व्यक्तीरेखा कधी "मस्तानी" पासून वेगळी करुन एक अपराजित सेनानी म्हणून मांडलीच नाही त्यात आता ह्या गल्लाभरु सिनेमाची भर.

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णुता ?

आमिर खानचा नविन सिनेमा येतोय का ?

मागे एकदा कुठल्या तरी सिनेमाच्या रिलीजच्या तोंडावर नर्मदा बचाओ आंदोलनात जाउन मेधाताईंच्या बाजूला बसलेला 

ते प्रकल्पग्रस्त बुड़ले धरणात की जीवंत आहेत हे माहितेय का त्याला ?

त्या कमाल खानचं समजु शकतो .....पण फुक्कट पब्लिसिटी मिळवायला आमिर खानला पण असले धंदे करावे लागतात का ?

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

बिहार विधानसभेचे निकाल

बिहार विधानसभेचे निकाल यायला सुरुवात झाली तसे भाजपचे सोशल मीडियावरचे विद्वान वाचाळवीर भलतेच कार्यरत झाले.
"दिल्लीत सुशीक्षीतांनी आप ला निवडून आणले मग पाणीपूरीवाल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार" अशा आशयाची बेताल वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांच्या फेसबुक वॉल वर झळकायला लागली.

खरं तर "पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला फसवणं सोपं होतं पण पाणीपुरीवाल्यांना फसवणं भाजपला अवघड गेलं" असंही म्हणता येईल की.

दीड वर्षापूर्वी मिळालेला विजय भाजपला अजुन पचवता आलेला नाही त्यात हा असा पराभव कुठून पचणार ?

उन्माद ....पक्षाच्या विरोधातले ते सगळे मुर्खच ही भूमिका ....वाचाळवीरता ...... हे सगळे गुण भाजपच्या पक्षशिस्तीचा भाग झालेत का ?

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

ऑफिस मध्ये "कांड"


आमच्या ऑफिस मध्ये रोज काही तरी "कांड" चालू असतात ..........

मलाही सोडत नाही कोणी ......आज माझ्या केबिनच्या बाहेर, माझ्या नावाच्या पाटीखाली हा उपद्व्याप करून ठेवलाय कोणी तरी .......

मला कल्पना आहे तशी हे डोकं कोणाचं असणार त्याची ....

........इन ऑफिसवालो से मुझे बचाओ........