गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

मोठ्या लोकांचं ऐकायलाच पाहिजे


वयाने आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांचं ऐकायलाच पाहिजे प्रत्येकाने .......................त्यांना जास्त कळतं म्हणून नाही पण ...............त्यांनी आयुष्यात आपल्यापेक्षा जास्त माती खाल्लेली असते म्हणून
.
.
हे मुळात कोणी तरी इंग्रजीत सांगितलेलं आहे ...............मी सोप्पं करून सांगितलं ..........मला फार अक्कल आहे म्हणून नाही तर .............माझ्या फ्रेंडलिस्ट मध्ये बहुतांश लोक माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत म्हणून

‪#‎idiosyncraciesoflife‬

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

“विद्वान” आतापर्यंत करोडपती झाले असते....


कुचकटपणा ............उर्मटपणा ............. माजखोरपणा ........उठसुट लोकांना अक्कल शिकवणं....... ज्याचा त्याचा अपमान करणं.........आणि ज्या विषयातली अक्कल नाही त्यावरही ठासुन मत मांडणं ........
.
ह्या गोष्टी “सेवा” म्हणून लोकांना देऊन त्याचे जर पैसे मिळाले असते ....................तर माझ्यासारखे अनेक फेसबुकी “विद्वान” आतापर्यंत करोडपती झाले असते.

बायका..........

बायका ........बोलण्यात आणि नवऱ्याचा फोन, त्याचं फेसबुक ह्यावर पाळत ठेवण्यात जेवढी शक्ती आणि वेळ घालवतात

............. तेवढी शक्ती आणि वेळ चालण्यात घालवला तर....................

रविवार, २४ एप्रिल, २०१६

आज जरा जास्त झालेली आहे


एखादी व्यक्ती किती हलकट आहे ..........किती नीच आहे हे जगात फक्त तुम्हालाच माहित आहे असं वाटायला लागतं किंवा सगळ्यांना सगळं खूप Easily मिळालंय आणि तुम्हालाच तेवढं खूप जास्त struggle वगैरे करावं लागलंय असं वाटायला लागतं तेव्हा समजून जा ..................
.
.
.
आज जरा जास्त झालेली आहे ............हरामखोर मित्रांच्या “One for the Road” च्या आग्रहाला बळी न पडता ............ दोन पायांनी चालता येतंय तोवर नीट घरी निघा ............आणि घरी गेल्यावर तोंड बंदच ठेवा.......अगदी बायकोवर तुमचं किती प्रेम आहे ते पण सकाळी उठल्यावरच सांगा ............. नाही तर.......... त्यापुढे जे काय “struggle” करावं लागेल ते कुणाला सांगता पण नाही येणार आयुष्यभर .........